Digital Samruddhi

2023 मध्ये या 13 Steps मध्ये तुमचा व्यवसाय वाढवा ?

तुम्ही त्या लोकांना ऐकले आहेत का जे लोक बोलतात,

“फक्त एका महिन्यात तुमचा व्यवसाय वाढवा…”

“पैशाची गुंतवणूक न करता तुमचा व्यवसाय 10 पटीने वाढवा…”

“काहीही न करता झोपेत पैसे कमवा…”

हे लोक बरोबर बोलत आहेत का? पैसे गुंतवल्याशिवाय आणि न काही करता काही दिवसात व्यवसाय वाढू शकतो का?

तसे, तुमच्या माहितीसाठी, मी तुम्हाला सांगतो की इंटरनेटच्या या युगात, तुमचा व्यवसाय वाढवणे आता १ मोठे आव्हान नाहीये, परंतु हे लोक दावा करतात तितके सोपे देखील नाही.

परंतु या बदलत्या युगात, अशा अनेक Digital Strategies And Tools आज उपलब्ध झाली आहेत जी व्यवसायाला त्याच्या Target Customer पर्यंत पोहोचण्यास मदत करतात.

पण, पटकन व्यवसाय वाढवणारा Content वाचून किंवा पाहिल्यानंतर लोक मधेच कुठेतरी अडकतात आणि मग त्यांना समजत नाही कि, व्यवसायाला online कसे आणायचे किंवा आपला व्यवसाय कसा वाढवायचा हे समजत नाही.

खरतर, यासाठी Business Growth Process ला Step By Step समजून घेणे गरजेचे आहे.

आजच्या ब्लॉगमध्ये, मी सखोल विचार आणि माझा अनुभव एकत्र करून 13 Steps ची एक Process Explain केली आहे.

चला तर मग हे सर्व टप्पे समजून घेऊया, जे वाचल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा हे नक्कीच समजेल.

आपला ऑनलाइन व्यवसाय कसा वाढवायचा – 13 Step Strategy

काही वर्षांपूर्वीपर्यंत, जेव्हा जेव्हा “Online” या शब्दाबद्दल बोलले जायचे तेव्हा तो Fraud किंवा Scam यांसारख्या शब्दांशी जोडला जात असे.

पण आज त्याचा अर्थ बदलला आहे आणि नवीन व्यवसाय आता ऑनलाइन माध्यमांच्या मदतीने त्यांची Products किंवा Services त्यांच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत.

आज तुम्ही छोटे दुकानदार असो की मोठा व्यापारी असा, काही फरक पडत नाही, तुम्हीही इतरांप्रमाणे स्वतःला Digitally Transform करू शकता आणि तुमचे नेटवर्किंग वाढवू शकता.

पण हे सर्व कसे घडते? त्यासाठी खूप पैसे लागतात का? यासाठी बाहेर जाणे आणि बर्याच लोकांना भेटणे आवश्यक आहे का?

नाही, तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये बसून या Strategies सहजपणे Implement करू शकता.

चला तर मग जास्त वेळ न लावता समजून घेऊया, आपल्या बिझनेसला ऑनलाइन बिझनेस कसे वाढवायचे किंवा How To Grow Business Online In India 2023.

 

आपला व्यवसाय Online Grow करण्यासाठी या 13 Steps चे पालन करणे महत्त्वाचे आहे.

 

  1. Google Business Profile वर तुमचा व्यवसाय List करणे.
  2. बिझनेसला Local Directories And Marketplaces List करणे.
  3. आपल्या Target Customers आणि त्यांच्या गरजा समजून घेणे.
  4. असे Platform जिथे तुमचे Audience Time Spend करत आहे.
  5. Relevant Social Media Platform वर Profile तयार करणे.
  6. आपल्या Product Promotion साठी Influencers ची मदत घेणे.
  7. तुमची व्यवसाय वेबसाइट डिझाइन करणे.
  8. आपल्या Target Customers समोर आपली वेबसाइट आणणे.
  9. आपल्या वेबसाइटवर Customers ची Testimonials टाकणे.
  10. Direct Marketing Strategy Implement करणे.
  11. आपल्या Competitors ची Selling & Marketing Strategy समजून घेणे.
  12. Customers ला Attract करण्यासाठी Promotional Activities करणे.
  13. आपल्या बजेटनुसार Business को Advertise करणे.

 

1. Google Business Profile वर तुमचा व्यवसाय List करणे.

google my business

Google Business Profile हे एक Tool आहे ज्यावर तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा Oragnization लिस्ट करू शकता आणि त्याची Online Presence Manage करू शकता.

जर तुमचा Local Business असेल ज्याची Digital Presence तुम्हाला तुमची Reach वाढवू इच्छित असेल, तर Google Business Profile वर तुमच्या व्यवसायाचे Details टाकणे आवश्यक आहे.

Google Business Profile वर Optimize Profile तयार करून, तुम्ही तुमच्या Local Area मधील Potential Customers ला तुमच्या व्यवसायाकडे सहज आकर्षित करू शकता.

चला हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया.

समजा तुम्ही Google मध्ये “Best Men’s Salon Near Me” टाईप केले – आता तुम्हाला काय दिसते?

तुम्हाला अनेक Salon ची यादी नक्कीच दिसेल ज्यामध्ये त्यांची Website, Address, Contact No., Opening & Closing Hours, Ratings, Google Map Location दिसत असेल.

आता ज्या Salons चे चांगले Ratings असेल, User त्याच Salon च्या Profile वर क्लिक करेल आणि त्यांना संपर्क करेल.

यातून बिझनेस किती वाढू शकतो तुम्हीच याचा विचार करा.

तुम्हाला तुमचा Business Details टाकून, Website Address देऊन आणि तुमच्या ग्राहकांकडून Reviews & Ratings घेऊन एक Optimized Profile तयार करावे लागेल.

Note* :- Google ने जुलै 2022 मध्ये Google My Business App बंद केले आहे, परंतु तुम्ही Google Map वर जाऊन त्याच्या सर्व Features Access करू शकता.

2.तुमचा व्यवसाय Local Directories And Suitable Marketplaces वर देखील list करा.

Local Directories And Suitable Marketplace

आपल्या बिझनेसला कसे वाढवायचे मधील पुढची Step म्हणजे तुमचा व्यवसाय Local Directories And Suitable Marketplaces वर list करणे.

Local Directories तुम्हाला Business Enquiries आणून देते.

उदाहरणार्थ, जर तुमचा Manufacturing Business असेल, तर तुम्ही तुमचा व्यवसाय  IndiaMart, Yellow Pages, Just Dial, Sulekha, अश्या Online Directory Sites वर list करू शकता.

जेव्हा एखादी Interested Person या Sites ला भेट देईल, आणि तुमची Products पाहील तेव्हा तो तुमच्याशी संपर्क साधेल आणि अशा प्रकारे तुम्हाला Enquiries मिळतील

त्याचप्रमाणे, तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित Marketplaces शोधून तुमचे Products List करावी लागेल.

काही Common Marketplaces मध्ये Amazon, Myntra, Etsy, India Mart, Nykaa इत्यादींचा समावेश आहे.

सुरुवातीला, तुम्हाला लोकांच्या नजरेत यायला थोडा वेळ लागेल, पण तुम्ही जसजसे इतर स्टेप्स फॉलो कराल तसतसे लोक तुमच्या Products वर लक्ष द्यायला लागतील आणि जर लोक तुमच्या Products वर समाधानी असतील, तर तुमच्या Business Growth सुरू होईल.

 

3. तुमचे Target Customers आणि त्यांच्या गरजा समजून घ्या.

Target Customers

Target Customers आणि त्यांच्या गरजा समजून घेणे, ही एक अतिशय महत्त्वाची Step आहे. जर तुम्ही तुमचे Audience ओळखले तर तुम्हाला तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा हे देखील समजेल.

तुम्ही Offline Store चालवत असाल किंवा एखाद्या Particular Area मध्ये तुमची Service पुरवत असाल तर तुमचे ग्राहक कोणत्या प्रकारचे लोक आहेत हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, जर तुमचा साडीचा व्यवसाय असेल, तर फक्त महिलाच तुमचे Target Customer असतील आणि यामध्ये तुम्ही वयानुसार त्यांचे Categorise करू शकता.

त्याचप्रमाणे, जर तुम्ही Policy Agent असाल, तर कदाचित फक्त 25 – 60 वर्षांच्या लोकांना तुमची पॉलिसी घ्यायला आवडेल आणि हे लोक तुमचे Target Audience देखील असतील.

Target Customers ओळखल्यानंतर, त्यांच्या गरजा समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

असं नाही झाले पाहिजे कि, तुम्ही असे काहीतरी विकत आहात ज्याची त्यांना खरोखर गरजच नाही.

सोप्या शब्दात सांगायचे तर, तुमची Products आणि Services Market Fit असावीत आणि त्यांना खरेदी करण्यासाठी चांगली Market असावी.

त्यांची गरज समजून घेऊन आणि तुमची Products विकल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायात नक्कीच वाढ होताना दिसेल, आणि तेच तुमचे Repeat Customer होतील

मला आशा आहे की तुमचा व्यवसाय ऑनलाइन कसा करायचा हे तुम्हाला समजले असेल.

 

4. आपला Target Customers कोणत्या Online Platforms वर जास्त वेळ घालवत आहेत ते पहा.

Target Customers online platforms

Potential Customers ना समजून घेतल्यानंतर, आता ते कोणत्या Digital Platforms वर आपला वेळ घालवत आहेत हे तुम्हाला पाहावे लागेल.

ते Facebook वर जास्त Active असतात का?

का ते जास्त त्यांचा वेळ Instagram & YouTube वर घालवतात?

का त्यांना जास्त LinkedIn वर Active राहणे आवडते?

हा एक किंवा अनेक Platform देखील असू शकतो.

पण प्रश्न असा आहे की, तुमचे Potential Customers कोणत्या प्लॅटफॉर्मवर अधिक Active आहेत हे तुम्हाला कसे कळेल?

यासाठी तुम्ही Google ची मदत घेऊन “Competitor Analysis” करू शकता.

Competitor Analysis मध्ये, तुमचे Competitors कोणत्या प्लॅटफॉर्मवर Actively Work करत आहेत हे तुम्हाला पाहावे लागेल.

ते Facebook वर सतत Post करत आहेत का, ते Instagram वर Reel बनवत आहेत का, ते त्यांच्या Products ची माहिती लोकांना YouTube वर देत आहेत का?

हे सर्व Research तुम्हाला करावे लागेल, त्यानंतरच तुम्ही तुमची Strategy तयार करू शकाल.

चला तर मग आता पुढच्या Topic कडे वळूयात, How To Grow Online Business Fast Using Digital मार्केटिंग In 2023.

 

5. Relevant Social Media Platforms वर Business Profile तयार करा.

Relevant Social Media Platforms

आपला बिझनेस Online कसा वाढवायचा यामध्ये पुढे आहे, Social Media Platforms चा सदुपयोग कसा करायचा

तुम्हाला जगाची लोकसंख्या माहीत आहे का?

8 अब्ज म्हणजेच 800 कोटी, त्यापैकी सुमारे 300 कोटी लोक फेसबुकचे Monthly Users आहेत, त्यापैकी 30 कोटींहून अधिक Users भारतातच आहेत आणि Users च्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

त्याच वेळी, Instagram, LinkedIn, Twitter, Quora सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Users ची संख्या सतत वाढत आहे.

अशा परीस्थितीत असे समजून येते कि, सोशल मीडिया ही अशा विहिरीसारखी आहे, जिथून हात लावला की सोने बाहेर येणार हे Confirm आहे.

म्हणून, तुमचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी, ज्या Social Media Platforms वर तुमचे Target Audience त्यांचा वेळ घालवत आहेत त्यावर आपल्याला Active असणे महत्त्वाचे आहे.

काहीं लोकंसाठी ते Facebook असू शकते, तर काहींसाठी Instagram & YouTube असू शकते, तर काही लोकांसाठी फक्त LinkedIn. 

त्यामुळे, सर्वप्रथम तुम्हाला तुमचे Competitors कोणत्या Platforms वर अधिक Active आहेत हे पाहावे लागेल, त्या आधारे तुम्ही त्या संबंधित प्लॅटफॉर्मवर तुमची Profile तयार करून Content तयार करणे देखील सुरू करू शकता.

 

6. Product Promotion साठी Influencers ची मदत घ्या.

Product Promotion

आपल्या बिझनेसला कसे वाढवायचे, हे समजण्यासाठी तुम्हाला हे देखील समजणे गरजेचे आहे कि, तुम्हाला Influencers ची मदत कशी घेतली जाते

Influencers अशी व्यक्ती असते जिच्याकडेAudience Or Community असतो.

आपल्या Audience ला नवीन Products किंवा Services Recommend करण्यासाठी ते Brand सोबत Collaborate करतात, आणि काही Amount Charge करतात.

तुम्ही या Influencers ची मदत देखील घेऊ शकता आणि Deal करून तुमच्या Products ची जाहिरात करू शकता.

तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

तुमचा प्रयत्न असा असला पाहिजे कि, त्या Influencers सोबतच Deal करावी जे लोक तुमच्या Niche Or Industry मध्ये काम करतात.

यामधून हा फायदा होतो कि, Influencers की Community मध्ये जास्त लोक तेच असतात, ज्यांना तुमच्या Products मध्ये आवड असते.

अशा परिस्थितीत असे होईल कि, ते लोक तुमचे ग्राहक बनतील आणि तुमची विक्री वाढतच जाण्याची शक्यता आहे.

मला आशा आहे की तुम्हाला हे समजले असेल की आपला बिझनेस ऑनलाइन कसा वाढवायचा.

चला आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊ या आणि समजून घेऊयात How To Grow My Business Online In India 2023.

 

7. तुमच्या व्यवसायासाठी 1 वेबसाइट तयार करा.

For Use Business Website

जेव्हा Online Business Growth ची गोष्ट येते, तेव्हा तुम्ही Website ला Ignore नाही करू शकत

वेबसाइट हे प्रत्येक लहान आणि मोठ्या व्यवसायाचे डिजिटल स्वरूप आहे ज्यावर व्यवसाय त्यांची Products आणि Services list करतात, Visitors शी संवाद साधतात, त्यांचे Personal Details गोळा करतात आणि त्यांचा विश्वास जिंकून त्यांचे ग्राहकांमध्ये रूपांतर करतात.

वेबसाइट तयार करण्यासाठी तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता आहे, : Domain, Hosting And Website Builder  

Domain म्हणजे तुमच्या व्यवसायाचे नाव, जे तुम्ही तुमच्या व्यवसायाला देऊ इच्छिता. आणि लोकांनी तुम्हाला त्या नावाने ओळखावे असे वाटते.

उदाहरण – digitalsamruddhi.com हे डोमेन आहे, amazon.com हे डोमेन आहे, flipkart.com हे डोमेन आहे.

दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे Hosting, ज्यावर तुम्ही तुमची वेबसाइट Host करता जेणेकरून तुमच्या वेबसाइटचे Content इंटरनेटद्वारे Access करता येईल.

Best Hosting मिळविण्यासाठी, तुम्ही Bluehost कडे वळू शकता, जे मी स्वतः माझ्या वेबसाइटसाठी वापरतो. यांची Service खूप छान आहे.

तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे Website Builder किंवा Content Management System (CMS), ज्यावर तुम्ही तुमच्या वेबसाइटची सर्व Pages & Content ला Create करू शकता.

आजकाल डिजिटल जगात अनेक CMS आले आहेत, पण Popular And Most Used CMS चे नाव “WordPress” आहे.

जगातील 43% पेक्षा जास्त वेबसाइट्स या Content Management सिस्टमचा वापर करतात. तुम्ही पण या Drag & Drop Tool चा वापर करून तुमची Professional Website बनवू शकता.

Website Design करण्यापूर्वी, हे Essential Website Design Factors देखील जाणून घ्या.

 

8. तुमच्या Target Customer च्या नजरेत वेबसाइट आना.

Target Customer And Clients

फक्त वेबसाइट तयार केल्याने काम होईल का?

नाही बिलकुल नाही.

तुम्हाला ते तुमच्या Target Customer समोर न्यावे लागेल.

दुसऱ्या शब्दांत, तुम्हाला तुमची वेबसाइट Google च्या पहिल्या पेजवर आणावी लागेल, ज्यासाठी तुम्हाला Search Engine Optimization किंवा SEO करणे आवश्यक आहे.

SEO द्वारे, तुम्ही तुमच्या Target Customer द्वारे वापरल्या जाणाऱ्या Specific Words शब्दांसाठी Google वर वेबसाइट रँक करण्यात सक्षम व्हाल.

उदाहरण: तुम्ही ज्योतिषशास्त्राची Services देत असल्यास, तुमचे Target Customers Google वर त्यांच्या प्रश्न विचारण्यासाठी Specific Words वापरत असतील, जसे की,

Best Astrologer In Delhi, Astrologers Near Me, Best Astrologer Online, Astrologer For Love Marriage, Astrologer For Free Consultation, Etc.

SEO द्वारे, तुम्ही या Keywords वर Google च्या First Page वर First Three Positions तुमची वेबसाइट रँक करू शकता.

कारण फक्त 0.44% Searchers 2nd पेजवर जातात, First Page च्या First Three Positions वर Rank करणे आवश्यक होते.

हे तुम्हाला Organic Traffic आणून देते, याचा अर्थ असा आहे की तुमच्या व्यवसायात जास्तीत जास्त वाटा त्या लोकांचा आहे जे लोक तुमच्या व्यवसायात आवड ठेवतात

चला आता आपण पुढे जाऊया आणि इतर Steps समजून घेऊया की बिझनेसला पुढे घेऊन कसे जायचे.

 

9. वेबसाइटवर तुमच्या Customers चे Testimonials टाका.

Clients Testemoinal

आपला बिझनेस कसा वाढवायचा या मधील पुढील Step म्हणजे तुमच्या ग्राहकांकडून Testimonials घेणे.

Business चा Sale वाढविण्यासाठी Testimonials And Reviews; Major Selling Elements आहेत.

Existing Customers चे Testimonials पासून New Visitors मध्ये Trust Build होतो, ज्यामुळे Buying Decision करणे त्यांच्यासाठी सोप्पे होते.

 

10. Direct Marketing Strategy Implement करा.

 

तुम्हाला कधीही कोणत्याही Brand कडून Direct SMS आला आहे का?

तुम्हाला कोणत्याही कंपनीने Direct Promotional Email पाठवला आहे का?

जर तुमचे उत्तर होय असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की ही Direct Marketing Strategy आहे.

Direct Marketing मध्ये, आम्ही इतर Marketing Strategy प्रमाणे थेट आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचतो.

येथे आमच्या Potential Customer ची Contact Details आहेत, ज्याच्या मदतीने आम्ही त्यांच्याशी Direct Interact करतो.

Email, WhatsApp, SMS, Tele Calling, Posters, Brochures,  इ. याची काही उदाहरणे आहेत.

Direct Marketing द्वारे तुम्हाला तुमच्या Products ची माहिती Potential Customer ना द्यावी लागेल, Products चे फायदे सांगावे लागतील, ऑफर्स द्याव्या लागतील.

अशा आहे कि, तुम्हाला समजले असेल कि Direct Marketing पासून आपला online बिझनेस कसा वाढवायचा.

 

11. आपल्या Competitors ची Selling & Marketing Strategy समजून घ्या.

Direct Marketing Strategy

आपल्या बिझनेसला Fast Grow करण्यासाठी, या सर्व steps ला follow करणे गरजेचे आहे,पण कधी कधी अश्या काही situation पण येतात ज्यामध्ये आपली कोणतीच Strategy काम करत नाही.

अशा वेळेस तुम्हला तुमच्या सर्व Strategy पार्ट एकदा तपासून पाहाव्या लागतात. आणि आपल्या Competitors च्या Selling & Marketing Strategies ला Analysis करावे लागते. 

ही एक अतिशय महत्त्वाची Step आहे कारण हे तुम्हाला उत्कृष्ट Result मिळविण्यासाठी इतर लोक काय करत आहेत याची कल्पना देते.

ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर Active आहेत, त्यांनी त्यांचे Targeted Audience कसे निवडले आहेत, ते कोणत्या Influncers व्यक्तींची मदत घेत आहेत, ते कोणत्या Promotional Activities चालवत आहेत, ते त्यांच्या जाहिराती कुठे चालवत आहेत इ.

हे सर्व Factors तुम्हाला तुमची Strategies Tweak बदलण्यात मदत करतात जेणेकरून तुम्हाला चांगले Result मिळतील.

आशा आहे की ही Steps वाचल्यानंतर तुम्हाला ते How Can I Grow My Business Online2023 समजले असेल.

 

12. Customer Attraction साठी Promotional Activities करा.

Customer Attraction

तुम्ही Flipkart आणि Amazon सारख्या मोठ्या कंपन्या पाहिल्या असतील ज्या अनेकदा त्यांच्या Product वर सूट किंवा Deal देतात.

उदाहरणार्थ, फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल, Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि Stock Clearance Sale.

तुमच्या Potential Customers आकर्षित करण्यासाठी तुम्हाला काही Promotional Activities देखील करावे लागतील.

यामुळे लोकांमध्ये Urgency Create होते, आणि तुमच्या Offers & Sale मध्ये लगेच Enroll होतात.

आम्ही याला FOMO (फियर ऑफ मिसिंग आउट) स्ट्रॅटेजी असेही म्हणतो, ज्या अंतर्गत तुम्ही अशी भीती निर्माण कराल की जर तुम्ही आता निर्णय घेतला नाही तर ही Offer संपेल.

तुम्ही या Offers, Deals, Sale, ऑफर्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातींद्वारे दाखवू शकता, ज्याची आम्ही आमच्या पुढील भागात चर्चा करू.

या प्रकारच्या Promotional Activity मुळे तुमची विक्री वाढते आणि लोक तुम्हाला ओळखू लागतात, तुम्हाला ओळखतात आणि Customer बनतात.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय वेगाने वाढवू शकता.

 

13. बजेटनुसार तुमच्या व्यवसायाची Advertise करणे.

Advertise

जर तुमच्याकडे बजेट असेल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय कमी वेळेत Target Customers समोर न्यावयाचा असेल, तर ही Powerful Digital Marketing Strategy नक्कीच अंमलात आणा.

या Strategy ला Paid Ads किंवा Pay Per Click Advertisement म्हणतात, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या Ad Platform वर काही पैसे देऊन तुमच्या जाहिराती चालवू शकता.

तुम्ही तुमच्या Ads Google, YouTube, Facebook, Instagram LinkedIn सारख्या प्लॅटफॉर्मवर चालवू शकता.

लोक सहसा Google वर दोन प्रकारे Ads चालवतात:- काही Specific Keywords वर बोली लावून, त्यांची वेबसाइट सर्वात वरती आणून आणि इतर वेबसाइटवर Display किंवा Banner Ads चालवतात 

त्याचप्रमाणे, तुम्ही YouTube वर जाहिराती देखील चालवू शकता.

Social Media Platforms Like Facebook & Instagram वर Ads Run करण्यासाठी सुद्धा तुम्हाला १ Budget ठरवावे लागते, आणि त्यासोबत Target Audience Filter करण्याचा Option मिळतो.

या Ads चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या Ads फक्त त्या लोकांनाच दिसतात ज्यांना तुम्ही दाखवू इच्छिता.

Paid Ads कमी वेळेत चांगले Result देतात, चांगली Traffic Drive वाढवतात, Visitors ला Customers मध्ये रूपांतरित करतात आणि तुमची Reach वाढवतात.

म्हणून, आम्ही या ब्लॉगच्या तिसर्‍या Steps मध्ये (आपला Online बिझनेस कसा वाढवायचा) सांगितले की तुम्हाला Target Customer शोधावे लागतील जेणेकरुन तुम्ही या Paid Strategies च्या मदतीने त्यांना Target करू शकता.

 

निष्कर्ष :-

 

आपल्या बिझनेसला कसे वाढवायचे, How To Grow Your Business Online 2023, आपल्या दुकान बिझनेसला कसे वाढवायचे – हे काही सामान्य प्रश्न आहेत जे हजारो लोक रोज Search करत असतात.

परंतु, जे Result अनेकदा दाखवले जातात ते Step By Step Strategy स्पष्ट करत नाहीत, ज्यामुळे खूप गोंधळ होतो.

Business ला Successfully Grow करण्यासाठी, तुमच्या Target Customers ओळखण्यापासून त्यांची Online Activity, Social Media Presence, व्यवसायाची Website तयार करण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात.

ही सर्व कामे Step By Step कशी केली जातात, आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये In Detail समजून सांगितले आहे – How TO Grow Your Business In 13 Steps In 2023

मला मनापासून आशा आहे की, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यात नमूद केलेल्या सर्व Steps चा वापर कराल.

नमस्कार, माझं नाव ओंकार गायकवाड. मी Digital Marketing शिकवतो मराठीतून, आणि समजवून सांगतो कश्या पद्धतीने तुम्ही Digital Marketing शिकून त्याला Impliment करून तुम्ही तुमच्या बिझनेसला Online घेऊन जाऊ शकता, आणि त्याच्या मदतीने, उत्पन्नाचे नव-नवीन स्तोत्र बनवू शकतो, जर का तुम्हाला हे शिकायचं असेल, Impliment करायचं असेल, तर लवकरच मी एक या बाबतीत वेबिनार करतोय, खाली दिलेल्या लिंकवर Click करा, आणि वेबिनारला Register करा.

CLICK HERE

या कोर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

शिकत रहा, शिकवत रहा,

ओमकार गायकवाड. 

डिजिटल समृद्धी,

2 thoughts on “2023 मध्ये या 13 Steps मध्ये तुमचा व्यवसाय वाढवा ?”

Leave a Comment